Homeताज्या बातम्याचंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर; ठाकरे गटाच्या पाठिंब्याने संगीता खांडेकर विजयी, काँग्रेसला धक्का

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर; ठाकरे गटाच्या पाठिंब्याने संगीता खांडेकर विजयी, काँग्रेसला धक्का

चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी आणि राजकीय वादांमुळे चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत अखेर भाजपचा महापौर निवडून आला आहे. मंगळवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा केवळ एका मताने पराभव करत बाजी मारली.
या निवडणुकीत ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने सत्ता समीकरण बदलले. त्यानुसार प्रशांत दानव (ठाकरे गट) यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीवेळी 66 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुमताचा आकडा 32 पर्यंत खाली आला. भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांना 31 मते मिळाली. परिणामी काँग्रेसची सत्ता अवघ्या एका मताने हुकली.
महापालिका निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 66 जागांपैकी काँग्रेसला 27, भाजपला 23, ठाकरे गटाला 6, शेकाप 3, वंचित 2, अपक्ष 2, बसपा 1, तर शिंदे सेना आणि एमआयएम प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती आणि सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गट निर्णायक ठरला.
दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही उघड झाली. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील सत्तासंघर्षामुळे तोडगा न निघाल्याने पक्षाची भूमिका कमकुवत झाली. त्यातच ठाकरे गटाने महापौर पदाची मागणी केल्याने काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली.
शेवटी ठाकरे गटाने भाजपसोबत तडजोड करत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला मान्य केला. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद ठाकरे गटाकडे देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

error: Content is protected !!