Homeउद्योगडिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पेट्रोल पंपावर सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. “मर्यादित स्टॉक आहे”, “तहसील कार्यालयासाठी २००० लिटर डिझेल राखीव ठेवणे आवश्यक आहे” अशी कारणे देत अनेकांना डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही व्यावसायिक वाहनांना मोठ्या प्रमाणात डिझेल पुरवठा होत असल्याचेही सांगण्यात आले.

या प्रकारामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून शेतीची कामेही प्रभावित होत असल्याचा दावा INTUC कडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संघटनेने प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या देखील मांडल्या आहेत. त्यामध्ये संबंधित पेट्रोल पंपाची तपासणी, स्टॉक व विक्री नोंदींची पडताळणी, सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच “NO DIESEL” बोर्ड लावण्यामागील कारणांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनाला परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याचेही समोर आले आहे. अनेक नागरिकांनी समर्थन पत्रावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

सावली तालुक्यातील भीषण अपघात; ३० महिलांनी भरलेला टेम्पो उलटला; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते...

0
सावली ​: सतीश आकुलवार (मुख्य संपादक) सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला...

error: Content is protected !!