Homeताज्या बातम्या‘चंद्रपूरमध्ये टायगर जिवंत, मग गडचिरोलीत मेलेला होता का?’ काँग्रेस बैठकीत खासदार प्रतिभा...

‘चंद्रपूरमध्ये टायगर जिवंत, मग गडचिरोलीत मेलेला होता का?’ काँग्रेस बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकरांचा संताप; अंतर्गत वर्चस्वाची लढाई उघड

मुंबई : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांतील काँग्रेसच्या यशावरून पक्षात श्रेयवाद उफाळून आला असून, हा वाद आता उघडपणे समोर आला आहे. “चंद्रपूरमध्ये ‘टायगर जिवंत आहे’, असे सांगत विजयाचे श्रेय घेतले जाते, मग गडचिरोलीत टायगर मेलेला होता का? गडचिरोली हा माझा लोकसभा मतदारसंघ नाही का?” अशा तीव्र शब्दांत प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.
मुंबईत गुरुवारी झालेल्या काँग्रेस संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरपरिषद निवडणुकांतील चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाचे श्रेय केवळ आमदार विजय वडेट्टीवार यांनाच दिले जात असल्याच्या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही खासदार धानोरकर शांत झाल्या नाहीत. निवडणूक निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेता कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये तिकीट कापण्याचा प्रयत्न होत असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, चंद्रपूर व बल्लारपूर शहराध्यक्ष बदलताना आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप करत, महानगरपालिका निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करतानाही विश्वासात घेतले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
या घडामोडींमुळे चंद्रपूर–गडचिरोली पट्ट्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

error: Content is protected !!