मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नुकताच दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा मान उंचावला आहे. या निकालात कुमारी अवनी सुहास पुप्पलवार हिने 97.60 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन तसेच पेढे भरवत अभिनंदन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्याचा आणि त्यांच्या यशाचे कौतुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिष्टमंडळात भाजप मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, भाजप नेत्या सौ. किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. प्राची आक्केवार, सौ. अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे, आनंद आक्केवार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका प्राची आक्केवार यांनी विद्यार्थ्यांना संविधान बोर्ड भेट देत त्यांचा विशेष सत्कार केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यात अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















