मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने मूल शहरातील चामोर्शी नाका येथे भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
या सेवाभावी उपक्रमासाठी संदीप आगडे, साहिल येनगंटीवार, सचिन चन्नावार, हेमंत कोमलवार, सुरज मांदाडे, मयुर कावळे, रुपेश निकोडे व शुभम शेंडे यांनी विशेष योगदान दिले.
महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा समितीचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















