मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
दरार दुर्गा मंडळ, मुल, तर्फे सुप्रसिद्ध भजन गायिका सुचित्रा भगवाधारी यांचे जागरण 1 ऑक्टोबर 2025, बुधवार रोजी गुजरी चौक, मुल येथे आयोजित केले जाणार आहे.
भक्तिगीतांच्या माध्यमातून उपस्थितांचे हृदय भक्तीने भारावून टाकणाऱ्या या जागरणात भगवानाचे विविध भजन सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन दरार दुर्गा मंडळ मुल चे अध्यक्ष प्रशांत समर्थ यांनी सर्व भक्तांसमोर केले आहे.
दरार दुर्गा मंडळाच्या या विशेष आयोजनेत भक्तांना आध्यात्मिक अनुभव घेता येईल, तसेच भक्तिगीतांच्या सुरेल वातावरणाचा आनंद लुटता येईल.
सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला यशस्वी करावे, अशी मंडळाची अपेक्षा आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















