Homeआरोग्यगडचिरोली जिल्ह्यात मोहफूल मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; दारूबंदी समर्थकांना दिलासा

गडचिरोली जिल्ह्यात मोहफूल मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; दारूबंदी समर्थकांना दिलासा

गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

जिल्ह्यात तीन दशकांपासून सुरू असलेल्या दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर तसेच सामाजिक संघटनांच्या तीव्र विरोधाची दखल घेत प्रशासनाने प्रस्तावित ‘एलटीबी बिव्हरेजेस’ मोहफूल मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या जनसुनावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेली जनसुनावणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली आहे. यासंदर्भात मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुनावणी स्थगित करण्याची सूचना केली आहे.
दोन वर्षांपासून थंडबस्त्यात असलेल्या या वादग्रस्त प्रकल्पासाठी अचानक जनसुनावणी जाहीर होताच गडचिरोली जिल्हाभरातून तीव्र विरोधाचे सूर उमटले होते. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात मद्यनिर्मिती प्रकल्प उभारणे म्हणजे सामाजिक आरोग्यावर घाला असल्याची भूमिका विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी मांडली होती.
जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’सारख्या व्यसनमुक्ती मोहिमा सुरू असताना अशा प्रकल्पाला परवानगी देऊ नये, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि देवाजी तोफा यांनी व्यक्त करत प्रशासनाकडे लेखी आक्षेप नोंदवले होते.
दरम्यान, जनसुनावणी स्थगित झाल्याने मद्यमुक्तीसाठी लढा देणाऱ्या संघटनांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अनिश्चित असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मूल नगर परिषद प्रशासनाच्या कार्यकाळातील खर्चावर विशेष ऑडिटची मागणी

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सौ. प्राची आनंद...

मेंढा (लेखा) जंगलातून सागवान-बिजा वृक्षांची अवैध तोड; तिघांना अटक, ३० मार्चपर्यंत वनकोठडी

0
धानोरा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) गावालगतच्या जंगलातून सागवान व बिजा वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना अटक केली...

विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४०...

मूल शहरात घरगुती गॅस टंचाई; हॉटेलमध्ये गैरवापरावर कारवाई होणार का?

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत...

नक्षलग्रस्त भागात विकासाची चाके फिरली; गावात प्रथमच बस दाखल

0
भामरागड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभुशी या दुर्गम आदिवासी गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वातंत्र्याच्या तब्बल ७९ वर्षांनंतर प्रथमच...

error: Content is protected !!