बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारास भिक्खू संघाचे मोलाचे योगदान : संतोष सिंह रावत
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
बुद्धगिरी, मूल येथे भदंत संघवस थेरो यांच्या १९व्या वर्षावास समाप्ती निमित्त वर्षावास समाप्ती संघदान व कठीण चिवरदान महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांचा भिक्खू संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास श्रद्धेय भदंत सुमनवंनो महाथेरो (महासचिव, महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ), भदंत संघवंस थेरो (बुद्धगिरी टेकडी, मूल), भदंत आनंद थेरो (बल्लारपूर), भिक्खू धम्मप्रकाश संबोधी (चंद्रपूर), भिक्खू सुजात (नागपूर) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संतोष सिंह रावत यांनी बुद्धगिरी टेकडीवरील भिक्खू संघासाठी सुंदर कुटी उपलब्ध करून दिली असून त्यांच्या या धम्मसेवेची दखल घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना संतोष सिंह रावत म्हणाले की, “भिक्खू संघ टिकला तर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार अधिक व्यापक होईल. समाजाने दान व सहकार्याद्वारे भिक्खू संघाला बळ द्यावे.” त्यांनी पुढे म्हटले की, “तथागत गौतम बुद्धांचा करुणा, मैत्री व प्रज्ञेचा संदेश आजच्या जगासाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
भदंत संघवस थेरो यांनी रावत यांच्या धम्मदान कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “त्यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांचे कार्य अखंड सुरू राहो हीच आमची शुभेच्छा.”
कार्यक्रमास काँग्रेस तालुकाध्यक्ष गुरु गुरुनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस शहराध्यक्ष सुनील शेरकी, युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, पवन नीलमवार, सुरेश फुलझले, ललिता फुलझले, डेव्हिड खोब्रागडे, सुजित खोब्रागडे, आकाश दहिवले, संदीप मोहबे, सौरभ वाढई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















