मूल : भगवान मोहुर्ले (शहर प्रतिनिधी)
मूल शहरात वाढत्या मोकाट जनावरांच्या, विशेषतः डुकरांच्या, त्रासाबाबत शिवसेनेचे (उ.बा. ठा.) जिल्हा प्रमुख संदीप अनिल गिहें यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शहरात मोकाट जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांचे हाल होत असून अपघातांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये मोकाट जनावरे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होत आहेत, तसेच मोकाट डुक्करांमुळे अस्वच्छतेचे वातावरण तयार झाले असून आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचे गिहें यांनी म्हटले आहे.
या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन जनावरे पकडण्याची आणि त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्याची कार्यवाही नगर परिषदेने करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा नागरिकांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
गिहें यांनी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















