गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि मागासलेल्या पूर्व भागातील धानोरा तालुका आता आरोग्यसेवेत आणखी सक्षम होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सीआरसीएस फंडातून येथील नागरिकांसाठी नवीन रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि वनक्षेत्रातील रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे यांचे विशेष पुढाकार आणि पाठपुरावा झाला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















