Homeक्राईमगुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)

गुटखा ,मावा, सिगारेट, सुपारी, पान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून्, आजही मोठ्या प्रमाणात गुटखाच्या माध्यमातून् ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात.

त्यामुळे यासंदर्भातील कायदे अधिक कडक केले जातील. तसेच, त्यात अधिक सुधारणा करून अशा प्रकरणी मकोका लावणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या गुटखा विक्रीस मनाई आदेश आहे. त्यानंतरही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार विविध गुन्हे नोंदवून १७ लाख ४० हजार रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. नवी मुंबईत ११४४, अहिल्यानगर १८५, जालना ९०, अकोला ३५, नाशिक १३१, चंद्रपूर २३०, सोलापूर १०८, बुलढाणा ६३४, नागपूर ४९, यवतमाळ १७०६ गुन्हे दाखल करण्यात आले. गुटखा विक्री थांबविण्यासाठी संयुक्त कारवाई पथकेही स्थापन करण्यात आली. अंमली पदार्थाच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निदेंशानुसार जिल्हास्तरीय नाकों कोऑडींनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती अशा समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परीसरात व आजुबाजुच्या परीसरात दुकानांमध्ये नशाजन्य गोळया व चॉकलेट किंवा इतर काही खाद्यपदार्थाचे मुलांना विक्री हेाणार नाहीत, या अनुषंगाने नियमित पोलीसविभागामार्फत डमी ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात येत आहे. असे असले तरी अशी विक्री सुरूच असल्याने त्यावर कठोर प्रतिबंध घालण्यासाठी कमकुवत कायदा अधिक कठोर व कडक करण्यासाठीचे निदेंश कायदा व विधी विभागाला सांगण्यात आले. मकोका लावतानाच त्यांच्यावर एनसीओसी करता येईल. यासोबतच अशा प्रकरणी दजेंदार पुनर्वसन केंद्र तयार करण्याचेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रईस शेख यांनी भिवंडीत आजही मोठया प्रमाणात गुटखा व ड्रग्जची विक्री होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर भिवंडीत विशेष कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२५ लाखांच्या अपहारप्रकरणी कारवाई नाहीच; सोनसरी ग्रामस्थांचा १७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

0
कुरखेडा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी ग्रामपंचायतीत माजी ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर सुमारे २५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा गंभीर...

मूल उपपथक होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
होमगार्ड पथकाकडून रूट मार्च, स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मूल : तालुका प्रतिनिधी मूल उपपथक होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी...

ब्रम्हपुरी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यावर विभागीय चौकशी सुरू; अहवालानंतर निलंबनाची कारवाई — गृहराज्यमंत्री...

0
नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवाल प्राप्त...

देऊळगाव-इंजेवारी परिसरातील दहशत संपली! ‘ऑपरेशन लेपर्ड’ यशस्वी; वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

0
आरमोरी : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) आरमोरी तालुक्यातील देऊळगाव-इंजेवारी परिसरात अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने ‘ऑपरेशन लेपर्ड’ अंतर्गत जेरबंद केले. ११ डिसेंबरच्या मध्यरात्री...

मालवाहू ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा जागीच मृत्यू

0
गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) गडचिरोली शहरातील बी-फॅशन प्लाझा समोर आज बुधवारी (दि. 10) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात स्कूटी घसरून...

error: Content is protected !!