मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असताना प्रतिष्ठित गोयल परिवारातील शिक्षित, अभ्यासू आणि समाजाभिमुख तरुण ऋतिक दिनेश गोयल यांनी प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून उमेदवारीची दमदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून आणि कार्यशैलीतून प्रेरित होत ऋतिक यांनी राजकारणात पहिली पायरी टाकली आहे.
लहानपणापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या ऋतिक गोयल यांचा सर्वसामान्य नागरिकांशी कायम संवाद राहिला आहे. प्रभागातील समस्या, विकासाच्या गरजा आणि जनतेच्या अपेक्षा यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
“जनतेची सेवा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे आयुष्य समर्पित करणार आहे,” अशी स्पष्ट भावना त्यांनी व्यक्त केली.
शहरात तरुण व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची उमेदवारी विशेष चर्चेत असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आधुनिक युगात अनेक तरुण आरामशीर जीवन पसंत करतात, मात्र जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे ऋतिक गोयल हे पुरस्कारार्थ राजकारणात उतरले असल्याने त्यांच्या पहिल्या राजकीय विजयानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिकांचा विश्वास आहे की, प्रभाग ५ मध्ये काँग्रेसकडून नव्या ऊर्जेची, ताज्या विचारांची आणि सकारात्मक बदलाची खूण असलेली ही उमेदवारी आगामी निवडणुकीत निश्चितच दमदार विजय मिळवेल.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















