मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मूलचे अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी संस्था मूलचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे संचालक संदीप कारमवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबवला. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, वह्या व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंदात वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका कल्पना मारगोनवार यांनी केले. अंगणवाडी सेविका हजारे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाला आकापूर येथील उपसरपंच साहिल येनगंटीवार यांच्यासह नितीन पेंटेवार, राहुल संगीडवार, मुकेश डोनेवार, अनिकेत संगीडवार, रितेश नैताम, अभिषेक रेड्डीवार, मुकेश येरमे, मोरेश्वर बोलीवर, यश येरमे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















