राजगड : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
दि. १८/०१/२०२६ — येथील स्वर्गीय बापूजी पाटील हायस्कूल मध्ये सन १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १८) अत्यंत उत्साहात पार पडला. तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या सुमारे ८० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शाळेतील माजी शिक्षकांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात माजी शिक्षकांचा सत्कार, जुन्या आठवणींना उजाळा देणारे संवाद, विविध मनोरंजक खेळ, भोजन व नृत्य असे रंगतदार उपक्रम पार पडले. माजी विद्यार्थ्यांना जुन्या वर्गखोल्यांमध्ये बसण्याची संधी देण्यात आली; त्या क्षणी शालेय जीवनातील गोड स्मृती पुन्हा जिवंत झाल्या. शिकवणी वर्गांचेही आयोजन करण्यात आले.
या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शिक्षक श्री. ढवस सर होते. माजी मुख्याध्यापक श्री. कोरेकार सर (मा. मु.), विद्यमान मुख्याध्यापक श्री. दुस्सावार सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेतील कर्मचारी किशोर आलाम व भाऊराव गोंगले यांचे मोलाचे योगदान लाभले.
गेट-टुगेदरच्या नियोजन व व्यवस्थापनासाठी माजी विद्यार्थी कैलास कोसरे, डॉ. देवेंद्र लाडे, राहुल मारकवार, दिनेश रापेल्लीवार, मनोज नन्नावरे, रोशन आलाम तसेच समस्त माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
वृक्षारोपण, नृत्य, म्युझिकल चेअर यांसह सर्व उपक्रमांचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. जुन्या वर्गखोल्यांमध्ये बसून आठवणींना उजाळा देताना १९९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा आनंदोत्सव अविस्मरणीय बनवला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















