मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल येथून अखिल भारतीय माळी महासंघ, मूल तालुका अध्यक्ष सुरज मांदाडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते नायगाव येथे होणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या भव्य भूमिपूजन सोहळ्यासाठी आज रवाना झाले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहून समाजसुधारणा, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचा संदेश बळकट करण्यासाठी माळी महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवण्यात येत आहे.
यावेळी सुरज मांदाडे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, महिलांसाठी उभारण्यात येणारे स्मारक व प्रशिक्षण केंद्र समाजाला नवी दिशा देणारे ठरेल.
या प्रसंगी माळी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून, “चला नायगाव!” या संदेशासह उत्साहात नायगावकडे प्रस्थान केले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















