मूल नगरपालिका निवडणुकीत हा बदल मोठा ‘गेमचेंजर’ ठरेल का?
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील राजकारणात आज मोठी आणि अनपेक्षित हलचल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार आशिष करकाडे आणि कृणाल विरगमवार यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत.
या प्रवेशामुळे भाजपा उमेदवार निलेश राय यांच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पक्ष प्रवेश कसा घडला?
या पक्षप्रवेशासाठी भाजपाचे उमेदवार व शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, दीपक बोर्डावार यांनी स्वतः पुढाकार घेतला.
त्यांनी मूल शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते मोतीलाल टहलीयानी यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांची सहमती मिळवली.
यानंतर आशिष करकाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आज संध्याकाळी ५.३० वाजता भाजपा कार्यालयात औपचारिक पक्ष प्रवेश करण्यात आला.
या प्रसंगी खालील मान्यवरांची उपस्थिती होती
प्रवीण मोहुर्ले (शहराध्यक्ष)
प्रभाकर भोयर (ज्येष्ठ नेते)
मोतीलाल टहलीयनी
नंदू रणदिवे
अविनाश जगताप
पंकज लाडवे (भाजयुमो शहराध्यक्ष)
मनीषा गांडलेवार (महिला आघाडी अध्यक्षा)
अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते
नियुक्ती
जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या चर्चेनंतर आणि मंजुरीनंतर आशिष करकाडे यांची भाजयुमो शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राजकीय विश्लेषण
या प्रवेशामुळे प्रभाग 10 मधील निवडणूक अधिक रोचक झाली असून भाजपा पक्षाच्या मतांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















