मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगरपरिषदेतील सभापती निवडीदरम्यान तेली, माळी आणि कुणबी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरज मांदाडे यांनी केला आहे.
निवडीच्या प्रक्रियेत या समाजातील नगरसेवकांची संख्या आणि लोकप्रतिनिधित्व असूनही त्यांना कोणतेही सभापतीपद न देण्यात आल्याने हा अन्याय झाल्याचे मांदाडे यांनी सांगितले. ही निवड सामाजिक समतोल बिघडवणारी असून लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, भविष्यात अशा प्रकारे समाजघटकांना डावलण्यात आल्यास अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नगरपरिषद प्रशासनाने आणि राजकीय पक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्याय्य भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















