होमगार्ड पथकाकडून रूट मार्च, स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
मूल : तालुका प्रतिनिधी
मूल उपपथक होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन शुक्रवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर मा. श्री. कातकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी केंद्र नायक रवींद्र चरडे, प्रशासकीय अधिकारी नंदा सूर्यवंशी, पलटण नायक नरेश राहूड, मूलचे होमगार्ड प्रभारी अधिकारी सिद्धार्थ रामटेके, वरिष्ठ पलटण नायक वंदना गेडाम, अंशकालीन लिपिक रवींद्र भेंडारे तसेच सेक्सन लीडर रविंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त क्रीडा संकुल परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्वप्रथम क्रीडा संकुल ते गांधी चौकापर्यंत होमगार्ड पथकाने शिस्तबद्ध रूट मार्च काढून जनजागृती केली. त्यानंतर क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात वृक्षारोपण करून होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या वेळी प्रभारी अधिकारी सिद्धार्थ रामटेके तसेच वरिष्ठ पलटण नायक वंदना गेडाम यांनी उपस्थित होमगार्ड जवानांना मार्गदर्शन करत होमगार्ड सेवेचे महत्व, शिस्त, कर्तव्यनिष्ठा व समाजासाठी योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात होमगार्ड पथकातील पुरुष व महिला होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपपथकातील ASL प्रवीण निंबाळकर, भारत वाळके, सुरेश गोंधळे, चंद्रदीप शेंडे, ASL वनिता भेंडारे, मंगला चौधरी, सोनिया डोर्लीकर, सारिका डांगे तसेच इतर पुरुष व महिला होमगार्ड यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य केले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार
















