मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नगरपरिषद मूलच्या प्रभाग क्रमांक २ मधील रहिवासी श्री हरिदास लक्ष्मण हजारे यांना अल्पशा आजारामुळे उजव्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने या शस्त्रक्रियेमुळे त्यांना एक पाय गमवावा लागला. या कठीण परिस्थितीत त्यांना दैनंदिन हालचालींसाठी मदतीची गरज होती.
या संदर्भात प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका सौ. अश्विनी रुपेश निकोडे यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी मंत्री तथा आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र) यांच्याकडे तीनचाकी सायकलची मागणी केली. मुनगंटीवार यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसांत तीनचाकी सायकल उपलब्ध करून दिली, आणि दिलेला शब्द पूर्ण केला.
तीनचाकी सायकल सुपूर्द करताना सौ. उषाताई शेंडे (माजी नगराध्यक्ष), नंदूभाऊ रणदिवे (माजी उपाध्यक्ष), प्रशांतभाऊ बोबाटे (भाजपा महामंत्री), राकेशभाऊ ठाकरे (माजी युवा शहराध्यक्ष), रुपेश निकोडे (सामाजिक कार्यकर्ता), वामन शेंडे, मुकेश लोणबले, राजूभाऊ शेंडे, यशवंत गावतुरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या मदतीमुळे श्री. हजारे यांना नव्याने आत्मनिर्भरतेचा आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकासाठी तत्परतेने मदत करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















