गडचांदूर : अनिल गेडाम (तालुका प्रतिनिधी)
प्रभाग क्र. 07 मधील शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेविका सौ. मीनाक्षी एकरे या आगामी निवडणुकीत दुसऱ्यांदा नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात भक्कम पाया निर्माण केलेल्या एकरे यांनी विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण, तसेच महापुरुषांच्या जयंती–पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक प्रश्नांवर शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देत स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. पक्षातील एक सक्रिय, प्रामाणिक आणि विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांशी असलेला त्यांचा जवळचा संपर्क, साधेपणा आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा भांडवल ठरत आहे. राजकीय व्यवस्थेतूनच अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक शक्य असल्याची जाणीव असल्याने त्या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत.
त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 07 मधील निवडणुकीला खरा उमेदवार व विचाराचा रंग प्राप्त होणार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असून त्यांची पसंती दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















