– वाढदिवसानिमित्त योजनांचे लाभ व आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्थानिक समाजकार्यातून नाव निर्माण केलेले आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे निकट सहकारी म्हणून ओळखले जाणारे जितेश कुळमेथे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिक, समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वाढदिवस सोहळा सेवाभावी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
वाढदिवसाच्या निमित्ताने महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळावे यासाठी चाहत्यांनी शहरातील मंदिरात आरती आयोजित केली. भक्तीमय वातावरणात शेकडो समर्थकांनी उपस्थित राहून प्रार्थना केली. या प्रसंगी “कुळमेथे यांच्या नेतृत्वगुणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे” असे मत अनेकांनी व्यक्त केले. याच दिवशी शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात वयोवृद्ध, महिला, विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. लाभार्थ्यांनी वाढदिवसाच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करत त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शेकडो नागरिकांनी रक्त तपासणी, शारीरिक तपासणी, नेत्र तपासणी या सेवांचा लाभ घेतला. आरोग्य शिबिरात मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला.
संपूर्ण दिवसभर घेतलेल्या उपक्रमांमुळे जितेश कुळमेथे यांच्या नेतृत्वाला मिळणारा जनतेचा व्यापक पाठिंबा पुनश्च अधोरेखित झाला. सर्वांगीण सामाजिक कामांद्वारे लोकांशी असलेला त्यांचा निकटचा संबंध पुन्हा एकदा दृढ झाल्याचे चित्र या कार्यक्रमांतून दिसून आले. वाढदिवस साजरा करतानाही सेवा, सामाजिक बांधिलकी आणि लोकांच्या कल्याणाची भावना जपण्याचा प्रयत्न जितेश कुळमेथे आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी भाजप महानगर
जिल्हाध्यक्ष श्री सुभाष भाऊ कासमगोट्टूवार, महामंत्री सौ.सविताताई दांडारे, मनोज पाल, प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर विधानसभा प्रमुख,नरेंद्र बोपचे, गजानन राऊत, तपोश डे,चंद्रशेखर देशमुख, सौ आशाताई देशमुख, सौ सारिका संदुरकर, सिद्धार्थ मेश्राम, जितेश पॉल श्री निखिल कोडापे, महेश चाहरे, वैभव अंबाडे,विजय देशपांडे, प्रवीन पंचबुद्धे,मुन्ना जाधव, डॉ गिरीधर येडे, दिनकर सोमलकर, वंदना जांबुळकर,संतोष भंडारवार सिंपल उरकुंडे,परशुराम चव्हाण, गणेश किन्हेकर, एकनाथ मोहितकर श्री विजय पाटील श्री मनोज गणवीर अतुल बोधे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















