मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सह्याद्री क्रीडा मंडळ, चितेगाव यांच्या माध्यमातून दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद लाभला.
या स्पर्धांचे उद्घाटन संदीप कारमवार (अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी संस्था, मूल) यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मिलिंद रंदये (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, चितेगाव) यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विवेक मुत्यलवार (नगरसेवक, मूल) यांच्यासह सुनिल झरकर, विनोद देशमुख, ज्योतीताई मेश्राम, अल्काताई उईके, सुरेश यातकेलवार, देशमुख ताई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कबड्डी महोत्सवात बाहेगावासह एकूण ४६ संघांनी सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या सामन्यांनंतर विजेते ठरलेल्या संघांना बक्षीस वितरण संदीप कारमवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर मिलिंद रंदये, पत्रु दांडेवार, तुकाराम रंदये, मा. अरुण मेश्राम, साहिल येनगंटीवार, पुंडलिक रंदये आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड, संघभावना आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















