मूल (चंद्रपूर): सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील कोसंबी व चितेगाव परिसरातील रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मूल शहरचे उपाध्यक्ष सुरज रमेश मांदाडे यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोसंबी व चितेगाव मर्यादेतील रेतीघाटांवर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन कोसंबी व चितेगाव येथील रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन; कारवाईची मागणी
मूल तालुक्यातील कोसंबी व चितेगाव परिसरातील रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मूल शहरचे उपाध्यक्ष सुरज रमेश मांडे यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कोसंबी व चितेगाव मर्यादेतील रेतीघाटांवर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू असून, यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे या अवैध उत्खननात काही कर्मचाऱ्यांची संगनमत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात महसूल विभागातील आर.आय. दर्जाचे कर्मचारी, कोतवाल व इतर कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आमदार मा. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. असून, यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे या अवैध उत्खननात काही कर्मचाऱ्यांची संगनमत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात महसूल विभागातील आर.आय. दर्जाचे कर्मचारी, कोतवाल व इतर कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा आमदार मा. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार