नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
काल दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता जट्टेवार सभागृह नागपूर येथे अखिल भारतीय बेलदार समाज नागपूर संघटनेची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
मिटिंगची सुरुवात बेलदार समाजाचे प्रेरणास्थान दिवंगत मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.
मा. विनोद आकुलवार, सहसचिव यांनी मिटिंगची सुरुवात केली, त्यावेळी मंचावर अध्यक्ष श्री अण्णा गुंडलवार, श्री रविद्र आकुलवार, डॉ. विवेक अनंतवार,मुकुंद अडेवार, श्री उल्हास जंगीटवार, डॉ. अल्का जोगेवार उपस्थित होत्या.
संघटनेचे सचिव मुकुंद अडेवार यांनी प्रस्तावना सादर करतांना नागपूर येथिल बेलदार समाजाचा प्लांट नरेंद्रनगर व बेलदार नगर येथील प्लॉट बद्दल सर्व सविस्तर माहिती सादर केली. 1975 ला घेतल्या गेलेल्या प्लॉट ची आजची वर्तमान स्थितीची इतिमभूत माहिती समाज बांधवाना देण्यात आली. त्याची पुढील दिशा सुद्धा ठरविण्यात आली आणि या विषयावर सर्व उपस्थित समाज बांधवांनचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यात डॉ. वैशाली बेझलवार,डॉ. अर्चना दाचेवार, रविंद्र आकुलवार, अँड. सुभाष बोर्डेकर, श्री प्रकाश अडेवार,वर्धा येथील श्री अशोकजी आकुलवार, अरुण आकुलवार, उल्हास जंगीटवार,मनोज कार्लेवार,मृणाली सिंगम, अँड डॉ राजेंद्र गुंडलवार, अँड. संजय जोगेवार,श्री विवेक नागुलवार, यांनी आपले विचार मांडले.
सभेत एकमताने हा प्लॉट सर्व प्रथम आपल्या ताब्यात घ्यावा. त्याचा पूर्ण टॅक्स भरावा, जुनी संस्था रिनीव्हल करून घ्यावी. योग्य अभ्यासक यांची समिती तयार करावी. असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याला सर्व सभेने आवाजी मताने पारित केले.
2. संघटना आपल्या दारी सर्व शाखिय हिंदू बेलदार, ओड, कुमावत, तेलंगु, मुन्नर, कापेवार , नून्यानी, गवंडी, अश्या सर्व उपजातीचे प्रश्न समजून घेणे, समाजबांधवान सोबत चर्चा करणे, त्यांना माहिती देणे, सामाजिक विकासात्मक कार्य करणे, सर्व समाजबांधव यांना एकत्र करणे या माध्यमातून *संवाद यात्रा* पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण, अश्या 4 भागात ही यात्रा काढायची आहे. यासाठी सभेमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व सर्वानुमते आवाजी मतदानाने ठराव पारित करण्यात आला.
अध्यक्षीय भाषण श्री अण्णाजी गुंडलवार यांनी केले. समाज एकत्र होणे ही काळाची गरज आहे. प्लॉटची जवाबदारी योग्य लोकांना देऊन त्याला व्यवस्थित करून देण्यात येईल. वेळोवेळी समाजबांधवान सामोर माहिती सांगण्यात येईल. लवकरच संवाद यात्रेची माहिती समाजा पर्यंत पोहचविल्या जाईल. त्यानुसार ही यात्रा निघेल.
यावेळी डॉ. रविद्र सकुंदरवार, रमेश गट्टेवार , श्रीमती ललिता मामीडवार, सुधाकर सिंगलवार,संध्या गोल्लीवार, वसंत गोल्लीवार,अमोल सिंगम,रंजना कालबागवार,प्रिति सिंगलवार,भारती सिंगम,स्वामींनी उपलप, राजू फेद्देवार, विजय भांडारवार,पंकज अनंतवार, अनिल पुप्पलवार, उमेश पारकर,निलेश उपलप,दिनेश वर्धेवार, डॉ प्रफुल शुद्धलवार,रतन इंगेवार, रुपाली श्रीगिरीवार, अर्चना कोट्टेवार,शुभांगी वर्धेवार,पूजा रेडलावार,सागर रेडलावार,प्रियंका मसकावार,योगेश मसकावार, रमेश चिमलवार, अश्विनी नागुलवार,शैलेश श्रीगिरीवार, अशोक मेक्रतवार, इत्यादी समाज बांधव, बंधु-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ अल्का जोगेवार यांनी केले. अल्पोपहार, चहा-पाणी करून बैठकीची सांगता झाली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















